चंद्रपुर जिल्हा

आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सकाळी घडली. त्यांनी आनंदवन येथील आपल्या राहत्या घरात त्यांनी आत्महत्या केली.त्यांना उपचारासाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
डॉ. शीतल आमटे या डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे यांची मुलगी आहेत.ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या डॉ. शीतल आमटे- करजगी या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. प्राथमिक माहितीनुसार शीतल करजगी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.