चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

विदर्भातील तापमानात सतत वाढ, शनिवारला चंद्रपूरचे तापमान सर्वाधिक

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून विदर्भातील तापमानात सतत वाढ होत आहे. चंद्रपूरचे तापमान तर सर्वाधिक असून शनिवार, 14 मे रोजी ते 46.2 अंश सेल्सियस एवढी नोंद झाली आहे. त्या खालोखाल ब्रम्हपुरीचे तापमान 45.4 अंश सेल्सियस आहे. सूर्य आग ओकत असल्याने वाढत्या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहे. विदर्भातील अनेक शहरांचा पारा 45 अंश सेल्सियसच्यावर गेला आहे. शनिवारी वर्धा 46.5, नागपूर 45.5, यवतमाळ 45, अमरावती 44.8, अकोला 44.6, गोंदिया 43.8, वाशिम 43.5, गडचिरोली 41.4, तर बुलढाणा येथे 40.7 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. मे महिन्यातील तापमानात सतत वाढ होत असल्याने दुपारच्या सुमारास चंद्रपुरातील मार्गावर शुकशुकाट दिसून येत आहे. तसेच बाजारातही दूपारच्या सुमारास ग्राहक फिरकत नसल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *