चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

विदर्भातील ओबीसी व विदर्भवादी चळवळीचे नेते डाॅ. अशोक जीवतोडे यांचा मुंबई येथे राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई येथ्ील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत 14 रोजी दुपारी 1 वाजता ज्येष्ठ ओबीसी व विदर्भवादी नेते डाॅ.अशोक जीवतोडे यांचा शरद पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काॅंग्रसे मध्ये प्रवेश घेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते जयंत पाटील, प्रफुल पटेल, श्रीमती सुप्रिया सुळे उपस्थित हेते. विदर्भाच्या विविध जिल्ह्यात पसरलेल्या शिक्षणसंस्था आणि ओबीसी महासंघाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर कामाची छाप असलेले डाॅ. अशोक जीवतोडे यांच्या रुपाने राष्ट्रवादीला जिल्ह्यात एक नवा चेहरा मिळाला आहे.
       विदर्भात व संपूर्ण देशत ओबीसी चळवळ सक्रिय करुन ओबीसींना न्याय देण्याचा व त्यांच्या मागण्या केंद्र व राज्य सरकारकडून मंजूर करण्यासाठी देशभरात विविध राज्यात ओबीसी समाजाचे अधिवेशने घेणे व चळवळी त्यांनी केल्या आहेत. डाॅ. अशोक जीवतोडे यांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेशाने गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी राहण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.