
घुग्घूस (चंद्रपूर) : येथील तहसील कार्यालया समोरील पोलीस वसाहतीच्या जागेवर एका राजकीय पक्षाने शासकीय जागेवर अतिक्रमण केले. अतिक्रमण जागेवर सेवा केंद्र उघडले. सोबत इत्तरांनीही अतिक्रमण केले. याची तक्रार नागरिकांनी केली. माध्यमातही बातम्या झळकल्या. त्याची दखल घेत अतिक्रमणधारकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
परिसरात शिल्लक राहिलेल्या जागेवर ही डल्ला मारण्यासाठी मोठ – मोठे शेड उभारण्यात येत असल्याने नागरिकांनी याची तक्रार तहसील कार्यालयात केली. याची दखल घेत 11 जून रोजी चंद्रपूर पोस्ट ” तसेच अन्य वेब पोर्टल व वर्तमानपत्रात बातमी प्रकाशित होताच प्रशासनाची कुभकर्णी झोप उघडली असून प्रशासन अतिक्रमण धारकावर कारवाईस सज्ज झाला आहे. मात्र, या राजकीय सेवा केंद्राच्या अतिक्रमणाची झळ छोट्या व्यवसायिकांर पडत असल्याचे चिन्ह दिसू लागले आहे.
पोलीस स्टेशन परिसरात मागील अनेक वर्षापासून लोहार काम करीत असलेले हरीश चव्हाण यांना तहसील कार्यालयाने अतिक्रमणा संबधित कागदपत्रा सह दिनांक 28/06/22 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय चंद्रपूर येथे बोळविण्यात आल्याने व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
राजकीय पक्षाच्या हव्यासाने छोट्या व्यापारी बांधवांच्या व्यापारावर संक्रांत आली आहे. आता प्रशासन या राजकीय अतिक्रमण धारकावर कारवाई करतो की फक्त नोटीसीने काम भागवतो हे येणारा वेळच सांगेल ?




