चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

लग्नातील अन्नातून 300 लोकांना विषबाधा

लग्न समरंभ म्हणजे केवळ जल्लोष, उत्साह, जेवणावळी, डी जे च्या तालावर थिरकणे, नटणे मुरडणे एकंदरीतच सर्वत्र आनंदी आनंद मात्र ह्या उत्साहाच्या सोहळ्यादरम्यान काही विपरीत घडले तर मात्र दोन्ही पक्षांच्या जीवाला घोर लागतो. जर लग्न समारंभात कुठलीही अप्रिय घटना घडली आणि ती सुद्धा मोठ्या प्रमाणावर तर मग मात्र सर्वांच्याच आनंदावर विरजण पडते. अशीच काहीशी घटना जिल्ह्यातील भद्रावती येथे उघडकीस आली असुन अन्नातून विषबाधा झाल्याने उपस्थित 700 पैकी जवळपास 300 वऱ्हाड्यांना उपचारासाठी दवाखान्यात भरती करावे लागल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, भद्रावतीच्या मारोतराव पिपराळे सभागृहात पाच दिवसांपूर्वी एका लग्नसमारंभात ओमसाई कॅटर्सने दिलेल्या जेवणातून तीनशेपेक्षा अधिक वऱ्हाड्यांना विषबाधा झाली असून, चंद्रपूर, भद्रावती, वरोरा व गडचिरोलीत त्यांच्यावर उपचार सुरू आहे. काही जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून, विषबाधा झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने या घटनेची दखल घेतली नाही. त्यामुळे लग्नात आलेले वऱ्हाडी आपआपल्या परीने खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून, या घटनेमुळे भद्रावतीत चांगलीच खळबळ उडाली आहे. भद्रावतीच्या भारत वासुदेव आस्वले यांच्या मुलीचे लग्न 10 मे रोजी मारोतराव पिपराळे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. गडचिरोलीतील वराकडूनही अनेक पाहुणेमंडळी या लग्नकार्याला उपस्थित होते. दरम्यान, या सभागृहात ओमसाई कॅटर्सचे संचालक अश्विन सिद्धमशेट्टीवार यांना ७५० लोकांच्या जेवणाचे कंत्राट दिले होते. लग्न समारंभानंतर जवळपास ७०० लोकांनी जेवण केले. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास आपआपल्या गावी नातेवाईक गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी अनेकांना उलट्या आणि हगवणीचा त्रास जाणवू लागल्यानंतर रुग्णालयात भरती करण्यात आले. जवळपास ३०० नातेवाईकांना जेवणातून विषबाधा झाली असून, चंद्रपूर, वरोरा, भद्रावती व गडचिरोलीत त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.