भारतीय कामगार सेना सलग्न महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना व चंद्रपूर विधानसभा युवासेना तर्फे आज दि.२८.१०.२२ला बंडखोर आमदारांच्या निषेध करण्यात आले मा.बंडू हजारे जिल्हाध्यक्ष कंत्राटी कामगार सेना मा नगरसेवक यांचा नेतृत्वात
तथा युवासेना उपजिल्हाप्रमुख कैलाश तेलतुंबडे व विधानसभा समनव्यक अमोल मेश्राम यांच्या सहकार्य ने बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांचा फोटो जाडुन यांचा विरोधात घोषणा देऊन जाहीर निषेध करण्यात आला सामान्य कार्यकर्ता पासून शिवसेनेन नगरसेवक खासदार,आमदार,मंत्री, असे अनेक पद देऊन ही
पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना एन वेळी धोका दिला त्या मुळे आज दि.२८.६.२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक कामगार सेना कार्यालय ताडोबा रोड तुकूम येथे जाहीर निषेध करण्यात आला या वेळी कामगार सेना शहर उपाध्यक्ष विशाल कावने,युवासैनिक मार्शल अडकीने,रिचर्ड रॉडरिक्स,इतर अनेक शिवसैनिकां ची उपस्थिती होती
पालकमंत्री, उपवनसंरक्षक व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन चंद्रपूर : मागील दोन दिवासात दोघांचा बळी आणि एका शेतकऱ्याला जखमी केलेल्या पट्टेदार वाघाचा पाच दिवसात बंदोबस्त करावा असा अल्टीमेटम जंगलव्याप्त क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आज बुधवारी (15 जून) ला वनविभागाल देण्यात आलेला आहे. पाच दिवसात वाघाचा बंदोबस्त करण्यात आला नाही तर वनविभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे […]
रेती तस्करीवर वनविभागाचा मोठा प्रहार ट्रॅक्टरसह मुद्देमाल जप्त; सहा आरोपींविरुद्ध वनगुन्हा दाखल राजुरा, दि.१९ जून वनपरिक्षेत्र राजुरा अंतर्गत वनगुन्हे व अवैध रेती तस्करी रोखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान वनविभागाने धडक कारवाई करत नियतक्षेत्र रामपूर येथील कक्ष क्रमांक १५२ मध्ये अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर मुद्देमालासह जप्त केला. या प्रकरणी सहा आरोपींविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला […]
योग ही निसर्गाने पुरातन काळापासुन दिलेली मौल्यवान देणगी आंतराष्ट्रीय योग दिना निमित्त विश्व योग नृत्य महोत्सवाचे आयोजन धावपळीच्या जिवनात मनुष्य आरोग्याकडे दुर्लक्ष करु लागला आहे. मात्र कोरोना संकटाने आपल्या निरोगी शरीराशिवाय कोणतीच संपत्ती मोठी नसल्याची शिकवण दिली आहे. योगामुळे आपले शरीर, मनाला अध्यात्म आणि सामाजिक दृष्ट्या तंदुरुस्ती लाभते. योग ही निसर्गाने मनुष्याला पुरातन काळापासुन दिलेली मौल्यवान देणगी असुन शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी व्हायचे असेल तर दररोज न चुकता किमान एक तास योगा करण्याची गरज त्यामुळे आपण योग प्रकाराला प्रोत्साहन मिळावे योग करण्यासाठी स्वंतत्र व्यासपीठ असावे या करिता योग भवन निर्मितीसाठी साठी एक करोड रुपये देणार असल्याची घोषणा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. आज मंगळवारी जागतिक योग दिनानिमित्त योग नृत्य परिवार ट्रस्ट यांच्या वतीने तर यंग चांदा ब्रिगेड यांच्या संयोजनाने पोलिस मैदान येथे विश्व योग नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या महोत्सवाला रामनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे, डॉ. गोपाल मुंदडा, आकाश घोडमारे, आशिष झा, ऐकाडे, सुरेश घोडके, प्रशांत कत्तुलवार, शशिकांत मस्के, जितेंद्र ईजगोरवार, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, प्रा. श्याम हेडाऊ, विश्वजित शाहा, अमोल शेंडे, राम जंगम, विलास वनकर, विलास सोमलवार युवती प्रमुख भाग्यश्री हांडे आदिंची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूर हा प्रदूषित जिल्हा आहे. अशा प्रदूषित आणि उष्ण जिल्ह्यात निरोगी राहण्यासाठी योग आणि योग नृत्य नित्य करणे गरजेचे आहे. शरिराराला ऊर्जा देण्यासाठी व्यस्त जिवणात थोळा वेळ काढून योग करत शरिर स्वस्थ ठेवले पाहिजे. आयोजकांनी योगाचा योग नृत्य हा नविन प्रकार चंद्रपूरात सुरु केल्या बदल यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी आयोजकांचेही आभार मानले. योगा हा व्यक्तीला शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि बौद्धिक पातळीसारख्या सर्व आयामांवर नियंत्रण ठेवून उच्च पातळीची संवेदनशीलता प्रदान करते. विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी तसेच अभ्यासावर त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी योगाच्या रोजच्या सरावाला शाळा आणि महाविद्यालयानेही प्रोत्साहन दिले पाहिजे. रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपली जीवनशैली संपूर्ण बदल केला आहे मात्र कोरोनामुळे आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला लागलो. निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती हे आपल्याला कळले आहे. भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्विकारली असून, योगासनांचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत. जगभरातील देशांनी केवळ योग स्विकारली नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. आताच्या घडीला संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट असताना योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. चंद्रपूरातही योगाचे महत्व नागरिकांना पटावे त्यांना योग साधना करण्याकरिता स्वताचे भवन असावे या भवनातून योगाचा प्रसार प्रचार व्हावा या करिता चंद्रपूरात योग भवनाची निमिती व्हावी या करिता माझे प्रयत्न असणार असुन या भवनासाठी एक करोड रुपये देणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या योग नृत्य महोत्सवात योग साधकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.