
चंद्रपूर(का. प्र )मूल रोडवरील आंध्रा बँक जवळील दोन चायनीज दुकानासमोर अतिक्रमण तोडून मनपाने कारवाई केली आहे. न्यू फ्रेंड चायनीज व अनुराधा चायनीज या दुकानांनी आपल्या दुकानासमोर टिनाचे शेड वाढवून अतिक्रमण केले होते. या दुकानदारांना नोटीस देऊनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.अखेर मनपा प्रशासनाने अतिक्रमण धारकावर कारवाई करीत अतिक्रमण हटविले. सारिका शिरभाते सहाय्यक नगर रचनाकर झोन क्र१ यांच्या अंतर्गत हि कारवाई करण्यात आली.



