चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

महाराष्‍ट्र ऑटो-रिक्षा चालक मालक संघटनेचे ना. सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर

महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेच्‍या वतीने दि. ०४.०९.२०२२ रोजी महाराष्‍ट्र राज्‍याचे वने, सांस्‍क़तिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या जनसंपर्क कार्यालयात ऑटोरिक्षा चालकांचे मागण्‍याबाबत बैठक घेण्‍यात आली. बैठकीत सर्व ऑटोरिक्षा पदाधिका-यांनी राज्‍यामध्‍ये कल्‍याणकारी महामंडळ स्‍थापित व्‍हावे, याकरीता मागील २० वर्षापासून पाठपुरावा सुरु आहे. त्‍या मागणीला धरुन मागील राज्‍याचे अर्थमंत्री असताना राज्‍यातील ऑटोरिक्षा चालकांनी कल्‍याणकारी ऑटोरिक्षा महामंडळाचे स्‍थापना करण्‍यात यावी, या महामंडळाचे तरतुदीकरीता ५ कोटी रु. घोषणा ही मागील अर्थसंकल्‍पात करण्‍यात आली होती. पण त्‍याचे अंमलबजावणी अजुनही झालेली नाही. त्‍याकरीता राज्‍यातील ऑटोरिक्षा चालकांना न्‍याय मिळवुन देण्‍याकरीता आपण स्‍वतः पुढाकार घ्‍यावा अशी मागणी महाराष्‍ट्र ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेचे संस्‍थापक अध्‍यक्ष राजेंद्र खांडेकर त्‍यांनी आपल्‍या मनोगतात व्‍यक्‍त केली. त्‍यावर महाराष्‍ट्र राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री यांनी येत्‍या महिन्‍याभरात राज्‍यातील ऑटोरिक्षा चालकांची सामुहिक बैठक मुंबई मंत्रालयात घेवु त्‍यावर तोडगा काढु असे ठोस आश्‍वासन दिले. तसेच गृहनिर्माण संस्‍था म्‍हाडा कॉलनीमध्‍ये १०० घरे अलॉटमेंट झालेली होती. त्‍यातील काही घरे बाकी असल्‍यामुळे त्‍यावरही मुंबई मंत्रालयात बैठक घेवुन त्‍वरित ऑटोरिक्षा चालकांना उर्वरीत घरे प्रदान करुन असेही ठोस आश्‍वासन दिले. या शिष्‍टमंडळात राज्‍याचे संघटन प्रमुख राजेंद्र खांडेकर, जिल्‍हाध्‍यक्ष मधुकर राऊत, जिल्‍हा सचिव सुनिल धंदरे, शंकर थोरात, रवी आंबटकर, हरिदास नागापूरे, विलास बावणे, खुशाल साखरकर, प्रशांत उराडे, राजु अलगुनवार, रमेश पुलीपाका, प्रमोद देऊळकर, राजेश पात्रा, परमेश्‍वर सरकार, सुजित विश्‍वास, अमित देवनाथ, राजु यादव, अजगर अली व असंख्‍या ऑटोरिक्षा चालक मालक पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.