चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

ट्रक आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात 3 जण गंभीर जखमी

चंद्रपुर :- चंद्रपुर – मूल महामार्गावर ट्रक आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात आज रविवारी संध्याकाळी 6 ते साडे सहा वाजताच्या दरम्यान झाला यात तिघे जण गंभीर जखमी झाले. चंद्रपुर – मूल मार्गावरील एमईल समोर चारचाकी व ट्रक चा भीषण अपघात झाला असून यात तीन जण गंभीर जखमी झाले असून जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या मार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.