मनोरंजन

बिग बींनीही स्वतःला केलं घरात बंद, शेअर केला महापालिकेचा स्टॅम्प

मुंबई : करोना विषाणूचा संसर्ग देशभरात झपाट्याने होत आहे. सर्वसामांन्यांपासून ते बॉलिवूड स्टार्सपर्यंत सारेच यापासून सुरक्षित राहण्याचे आवश्यक ते उपाय करताना दिसत आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या काळात स्वतःला घरात बंद करून घेतलं आहे. या यादीत आता बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या नावाचाही समावेश आहे. बिग बी यांनी स्वतःचं पुढील काही दिवस घरात राहण्याचा निर्णय घेतला आहे.

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. त्यांनी ट्विटरवर हाताचा फोटो शेअर केला. यावर महानगरपालिकेचा शिक्का उमटवलेला दिसत आहे. या शिक्क्यावर स्वतःहून घरात राहण्याचा निर्णय घेतल्याबद्दल अर्थात ‘कोरंटाइन’ होण्याबद्दल लिहिले आहे.

याचा अर्थ पुढील काही दिवस म्हणजे ३१ मार्चपर्यंत अमिताभ बच्चन त्यांच्या घरातच बंद राहणार. बिग बी यांनी चाहत्यांनाही यासंदर्भात माहिती दिली आणि स्वतःची काळजी घेण्यास सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.