मनोरंजन

गेम ऑफ थ्रोनचा अभिनेताही करोनाच्या विळख्यात

न्यूयॉर्क : करोना व्हायरसचा सर्वात जास्त फटका चीन पाठोपाठ इटली आणि अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत आपतकालीन आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. हॉलिवूडमधील अनेक कलाकारांना करोना या विषाणूची लागण झाली असून टॉम हँक्स आणि अभिनेत्री ओल्ग कुरिलैंको यांच्यानंतर आता हॉलिवूड अभिनेता इदरिस एल्बानेही सोशल मीडियावर त्याला करोनाची लागण झाल्याचं सांगितलं. त्याने ट्वीट करत म्हटलं की, ‘आज सकाळी मला कळलं की मी करोना पॉझिटीव्ह आहे. मला बरं वाटतंय आणि अजूनपर्यंत करोनाची कोणतीही लक्षणं माझ्यात जाणवतं नाहीयेत. असं असलं तरी मी स्वतःला सगळ्यांपासून वेगळं ठेवलं आहे. सर्वांनी घरात रहा आणि योग्य ती काळजी घ्या. घाबरण्याचं काही कारण नाही. मी माझ्या तब्येतीबद्दल वेळोवेळी सांगत राहीन.’ या विषाणूमुळे जगभरात ५ हजारांहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले असून अजूनही लाखो लोक या विषाणूशी लढा देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.