चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

बसच्या धडकेत 23 वर्षीय युवकाचा मृत्यू

राजुरा

राजुरा कोरपना आदिलाबाद जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 ब हा अपघात प्रवण महामार्ग झालं असून दोन दिवसांपूर्वी राजुरा येथील युवा महिला प्राध्यापिका वनिता चिडे ह्यांचा ह्याच महामार्गावर सोनुर्ली जवळ अपघात होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला होता ह्या घटनेची शाई वाळते न् वाळते तोच औद्योगिक नगरी गडचांदुर जवळ बसच्या धडकेत सोनुर्ली येथील 23 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली  सविस्तर वृत्त असे की कोरपना करून गडचांदुरच्या दिशेने येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस क्रमांक MH 13 CU 6339 ह्या बसने गडचांडुर कडून सोनुर्ली च्या दिशेने जाणाऱ्या निखिल बंडु पत्रकार ह्याला जोरदार धडक दिली. अचानक बसलेल्या धडकेने निखिल जागीच कोसळला व त्याच्या डोक्यातून रक्तप्रवाह सुरू झाला. बस चालक वाहक व इतर नागरिकांनी त्याला तत्काळ दवाखान्यात दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. गडचंडुर पोलिसांनी घटनस्थळाचा पंचनामा करून मर्ग दाखल केला असुन पुढील कारवाई सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.