
बल्लारशा राजुरा मार्गावर आज सकाळी 12 वाजताच्या दरम्यान भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात एका इसमाचा घटनास्थळी च मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी ला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.



