चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील समस्‍यांचे त्‍वरीत निराकरण करा – आ. सुधीर मुनगंटीवार

जिल्‍हाधिकारी व महत्‍वाच्‍या विभाग प्रमुखांबरोबर घेतली बैठक.

बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रात निरनिराळया विभागात अनेक समस्‍या आहेत. या सर्व समस्‍या त्‍वरीत सोडविण्‍यात याव्‍या असे निर्देश विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. जिल्‍हाधिकारी कार्यालयात जिल्‍हाधिकारी यांच्‍या प्रमुख उपस्थितीत अनेक विभागांच्‍या प्रमुखांबरोबर बैठक आयोजित करण्‍यात आली होती. ज्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने महाऔष्‍णीक विद्युत केंद्रमहावितरणवेकोलिजिल्‍हा परिषदजिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सकमहाराष्‍ट्र जीवन प्राधिकरणवनविभागसार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पोंभुर्णा नगर पंचायतशी संबंधित सिटी सर्व्‍हे ताबडतोब करावापंतप्रधान आवास योजनेचे पैसे परत पाठवू नयेसहाय्यक अनुदान पूर्वीप्रमाणेच द्यावेरिक्‍त पदे तातडीने भरावीघरकुल पाणीपुरवठा योजना नगर पंचायत कडून काढून जिल्‍हा परिषदेला जोडणे अशा अनेक विषयांवर आ. मुनगंटीवार यांनी तातडीने उपाययोजना करण्‍यास सांगीतले.

वेकोलिशी संबंधित भटाळीकिटाळीसिनाळा शी संबंधित अनेक समस्‍यांवर विस्‍तृत चर्चा झाली. यात भटाळीसाठी नविन पोल टाकणेओव्‍हरबर्डन कमी करणे या अशा अनेक विषयांवर लवकरात लवकर तोडगा काढण्‍याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी वेकोलि अधिका-यांना दिले. वनविभाग बफर झोनमध्‍ये अनेक वर्षांपासून राहत असलेले रहिवासी यांची घरे व शेती याचे अतिक्रमण जबरदस्‍तीने काढत आहे. ज्‍यामुळे तालुक्‍यातील अनेक गावांमध्‍ये असंतोष आहे. त्‍यामुळे गावाक-यांना त्‍यांची प्रमाणपत्रे तयार करण्‍यासाठी वेळ द्यावा व तोपर्यंत त्‍यांची अतिक्रमणे काढू नये असे स्‍पष्‍ट निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत्‍युमुखी पडलेल्‍या लोकांना देण्‍यासाठी हवी असलेली रक्‍कम वनविभागाकडे उपलब्‍ध नसते ती ताबडतोब उपलब्‍ध करून द्यावी. तसेच बांबु कारागीरांना बांबु मोफत देता येईल काय याचा अभ्‍यास करून याचा अहवाल लवकरात लवकर मला द्यावाअसे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले.

महावितरण कंपनी गेल्‍या काही दिवसांपासून विधानसभा क्षेत्रातील तसेच जिल्‍हयातील ग्राम पंचायतींच्‍या पथदिव्‍यांचे कनेक्‍शन बिल न भरल्‍यामुळे खंडीत करीत आहे. याआधी २०२१ पर्यंतचे बिल ग्रामविकास विभाग भरत आलेला आहे. यापुढेही ग्रामविकास विभागाने हे बिल भरावे व तोपर्यंत खंडीत असणारा विज पुरवठा त्‍वरीत सुरू करावा असे स्‍पष्‍ट निवेदन आ. मुनगंटीवार यांनी दिले. यासंदर्भात ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ तथा ग्रामविकास व महावितरण कंपनीच्‍या सचिवांबरोबर बैठक घेणार असल्‍याचे त्‍यांनी सांगीतले.

महाऔष्‍णीक विद्युत केंद्राचे सीएसआर निधीचे पैसे गेल्‍या तीन वर्षांपासून दिला गेला नाही. त्‍यामुळे विकासाची अनेक कामे खोळंबलेली आहे. ज्‍यामध्‍ये आरो मशीनची देखभाल व दुरूस्‍ती या व अशा अनेक कामांचा खोळंबा झालेला आहे. जी गावे प्रकल्‍पग्रस्‍त आहेत तेथील युवकांना प्राधान्‍याने आपल्‍याकडील कंपन्‍यांमध्‍ये सामावून घ्‍यावे असेही निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. कळमना व मानोरा येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्राचे उदघाटन ४ जुलै रोजी करावेअसे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांना दिले. पोंभुर्णा ग्रामीण रूग्‍णालयासाठी १५ काल्‍पनीक पदांची मंजूरी अजून शासनाकडून न आल्‍यामुळे त्‍यांचे उदघाटन लांबणीवर पडत आहे. यासाठी शासनस्‍तरावर पाठपुरावा करून याची लवकरात लवकर मंजूरी मिळवावी असे निर्देश जिल्‍हा शल्‍च चिकीत्‍सक यांना आ. मुनगंटीवार यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published.