चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

बल्लारपूर वनपरिक्षेत्रात मृतावस्थेत आढळला वाघ

चंद्रपुर :- बल्हारशाह वनपरिक्षेत्रा अंतर्गत नियतक्षेत्र सातारा कोमटी येथील उमरी जंगलात मध्ये वनविभागाचे पथक सामुहीक गस्त करीत असताना एक वाघ मृतावस्थेत आढळुन आल्याने वनविभागात खळबळ उडाली.  दिनांक 20/10/2022 रोजी सकाळी 11.15 वा. बल्हारशाह वनपरिक्षेत्रा अंतर्गत नियतक्षेत्र सातारा कोमटी मधील कक्ष क्र. 439 मध्ये सामुहीक गस्ती दरम्यान वाघ मृतावस्थेत आढळुन आला. सदर वाघ नर असुन वय अंदाजे 3 वर्ष इतके आहे. वाघाचे संपुर्ण अवयव सुरक्षित असल्याचे वनविभागाने कळविले त्यामुळे वाघाची शिकार झाली नसल्याचे वर्तविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.