चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

बल्लारपूर येथील हत्या प्रकरणात एका आरोपीला अटक

बल्लारपूर ( राज्य रिपोर्टर ) : बल्लारपूर येथील स्क्वेअर पॉईंट हॉटेल समोर 30 ऑगस्ट 2021 ला रात्री 10:30 वाजताच्या सुमारास मिलींद बोन्दाळे, वय-34 वर्ष रा.किल्ला वार्ड बल्लारपूर यांची धारदार शस्त्र व दगडाने हत्या करण्यात आली होती तसेच या वेळी मध्यस्थी करण्यास गेलेल्या संघपाल कांबळे रा.गणपती वार्ड बल्लारपूर व अन्य 1 व्यक्ती यांच्यावरही हल्ला करण्यात आला होता मात्र या हल्ल्यात सदर दोन्ही व्यक्ती जखमी असल्यामुळे त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलीस सूत्राच्या माहिती नुसार या घटनेतील मृतक व त्यांचे 2 साथीदार मद्यप्राशन करण्याच्या हेतूने या परिसरात आले होते तसेच आरोपीही याच हेतूने आले मात्र शाब्दिक बाचाबाची वरून मारामारी व हत्येपर्यंत प्रकरण गेले.

           विशेष बाब म्हणजे बल्लारपूर पोलिसांनी या हत्या प्रकरणात 764/2021 नुसार गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात 2 आरोपी असल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली असून बल्लारपूर पोलिसांनी मोबाईल ट्रेसिंगच्या मदतीने 1 आरोपी गणेश जंगमवार रा.बल्लारपूर यास अटक केली आहे तर दुसरा आरोपी सलमान शेख, रा.बल्लारपूर हा फरार असल्याचे वृत्त असून या दोन्ही आरोपी विरुद्ध भांदवी कलम 302, 323,324, 506, नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उमेश पाटील, पोलीस निरीक्षक बल्लारपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमीझ  मुलाणी करीत आहे अवघ्या काही तासातच या प्रकरणातील एक आरोपीला अटक करून दुसऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.