चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

बनावट देशी दारुखान्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अटकेत

चंद्रपुर :- दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, मुल यांनी दिनांक २५/०१/२०२३ रोजी मौजा चितेगांव च्या हद्दीत नोंदविलेल्या बनावट देशी दारुखान्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी पवन उर्फ गोलु वर्मा याच्याशी संपर्कात असलेल्या तयार माल वितरक करण्याचे काम करणारा उमाजी चंद्रहास झोडे वय – ४१ वर्ष रा. मिनघरी पो. अंतरगांव ता. सिंदेवाही जि. चंद्रपुर व दुसरा कच्चा माल पुरवठादार गुरुदास खुशाबराव संग्रामे (पोलीस पाटील, बोदरा) वय- ४६ वर्ष, रा. बोदरा ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपुर यांना सिंदेवाही येथील बसस्टॉपजवळ आज रोजी अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे सदर बनावट देशी दारुनिर्मीतीच्या गुन्हयात दारुनिर्मीतीसाठी लागणा-या साहित्याची वाहतुक करण्यासाठी व बनावट दारूची तस्करी व वाहतुक करण्यासाठी उपयोगात आणण्यात येणारा आयशर टेम्पो वाहन क्रमांक एम.एच.४० बी.एल. १८७५ व टाटा कंपनीची चारचाकी वाहन एम. एच. ३४ पी. ५८९० असा एकुण १९,५०,०००/- रुपयांचा मुद्देमाल वाहनासह या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आला.  सदर गुन्ह्यात आज अखेर एकुण ३६,००,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आसदर आरोपींना आज रोजी मुल येथील न्यायालयात हजर केले असता आरोपींची ०३ दिवसांची पोलीस कस्टडी मंजुर झालेली आहे. सदर बाबत पुढील तपास श्री संदीप आर. राउत, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, मुल हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.