
नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन
पंतप्रधानांच्या शिमला येथील कार्यक्रमाशी जिल्ह्याला जोडले जाणार असून पंतप्रधानांचा परिसंवाद कार्यक्रम दोन भागांमध्ये आयोजित केला जाईल. संवादाचा पहिला भाग जिल्हा कार्यक्रमाच्या स्वरुपात सकाळी 10.15 वाजता सुरू होऊन सकाळी 10.50 वाजता कार्यक्रमाचा समारोप होईल. या प्रसंगी पीएम किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता देखील लाभार्थ्यांना हस्तांतरीत केला जाईल. संवादाच्या दुस-या भागात निवड केलेल्या जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांशी पंतप्रधान व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे आभासी संवाद साधतील.
या योजनांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण व शहरी), प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण व शहरी), जलजीवन मिशन आणि अमृत योजना, प्रधानमंत्री स्व निधी योजना, एक राष्ट्र एक राशनकार्ड योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, आयुष्यमान भारत पीएम जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत हेल्थ ॲन्ड वेलनेस सेंटर आणि प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा समावेश आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.



