
आमदार चषक – 18 व्या राष्ट्रिय ज्युडो कराटे स्पर्धेचे थाटात उद्घाटन
आधिच्या काळात ज्युडो हा प्रकार लोक स्वताचे संरक्षण करण्यासाठी शिकत होते. मात्र आता हा खेळ प्रसिध्द होवू लागला असून या खेळाच्या देश पातळीवर स्पर्धा आयोजित होत आहे. या स्पर्धांमध्ये चंद्रपूरचा खेळाडूनेही सहभाग घेत यश संपादित केले पाहिजे. यासाठी त्यांना लागणारे व्यासपीठ आपण उपलब्ध करुन देत आहोत. या खेळांचे अनेक फायदेही आहे. एकंदरीत पाहता ज्युडो कराटे म्हणजे आत्मरक्षणासह शारिरिक, मानसिक सक्षमीकरणासाठी तयार केलेली कला असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आमदार चषक अंतर्गत 18 व्या राष्ट्रिय ज्युडो कराटे स्पर्धेचे मनपाच्या पटांगणात आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज शनिवारी संपन्न झाला. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आंतर राष्ट्रिय प्रशिक्षक गणेश पुरोहित, राष्ट्रिय पंच दिनेश छपाने, राष्ट्रिय पंच महेश निलेकर, पूर्वा खेडकर, वर्षा कोयचाडे, गायत्री देशमुख, विजय तेलरान्दे, योगिता बर्डे, नेहाल डांगे, संतोष गैनवार, संगीता बांबोडे, प्रिती बोरकर, सोमेश्वर येंचलवार आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूरचा विद्यार्थी आता विविध खेळ प्रकाराकडे आकर्षित होवू लागला आहे. अशा खेळाडंुना प्रोत्साहन देण्याचे काम आपन करत आहोत. नुकतेच आपण आमदार चषक अंतर्गत विदर्भस्तरिय बाॅडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत विदर्भातील बाॅडी बिल्डरांनी सहभाग घेतला होता.
ओकीनावा मार्शल आर्ट स्पोर्ट्स कराटे असोशिएशनच्या पदाधिका-र्यांनी 18 व्या राष्ट्रिय ज्युडो कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यासंदर्भात चर्चा केली होती. आपण तात्काळ सदर स्पर्धेसाठी आमदार चषक निधी अंतर्गत निधी उपलब्ध करुन दिला. खर तर लोकप्रतिनिधी म्हणून अशा खेळांना प्रोत्साहन देणे आमचे काम आहे. आमच्या मतदार संघातील खेळाडंुना मोठे व्यासपीठ उपलब्ध व्हावे हा आमचा मानस आहे. एकादी राज्य स्तरिय स्पर्धा चंद्रपूरात आयोजित होत असेत तर यात आपल्या जिल्हाचे नाव मोठे होते. त्यामुळे असे आयोजन सातत्याने होणे गरजेचे असल्याचे यावेळी ते म्हणाले. बदलत्या काळात मातीचे खेळ लृप्त होत चालली आहे. त्यामूळे चंद्रपूरातील विकासासाठी आपण मोठा निधी उपलब्ध करुन देत असतांना खेळांना सुध्दा प्रोत्साहन देण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न सुरु आहे. यात खेळांडुचाही मोठा प्रतिसाद लाभत असल्याचा आम्हाला आनंद असल्याचे ते यावेळी म्हणाले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते फीत कापून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत राज्यभरातील कराटे पट्टंुनी सहभाग घेतला आहे.




