चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

प्रशिकणार्थिनी घेतले पर्यावरण स्नेही बांबू बांधकामाचे धडे

वेकोली आणि बांसचा उपक्रम

पर्यावरण स्नेही बांबू बांधकाम क्षेत्र हे पर्यावरण संरक्षणासोबतच बांबू कारागीरांसाठी शाश्वत रोजगार निर्मितीचे प्रभावी माध्यम ठरू शकते तसेच झपाट्याने विस्तारणाऱ्या बांबू बांधकाम क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असल्यामुळे वेकोली चंद्रपूर क्षेत्राच्या निगमित सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत यशोदीप संस्था आणि बांबू आर्ट अँड नेचर सोसायटी (बांस) च्या वतीने स्थानिक नीम वाटिकारयतवारी कॉलरी येथे आठ दिवसीय बांबू बांधकाम कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन युवक युवतींसाठी करण्यात आले. वेकोली चंद्रपूर क्षेत्राचे महाव्यवस्थापक संजय वैरागडे यांच्या पुढाकाराने तसेच प्रशिक्षणार्थींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झालेल्या सदर प्रशिक्षण कार्यशाळेत बांबू बांधकामाशी संबंधित विविध तंत्रे आणि पद्धतींचा उपयोग करून बांबू बांधकाम तज्ञ व मुख्य प्रशिक्षक,बांबू आर्ट अँड नेचर सोसायटीच्या सचिव अन्नपूर्णा धुर्वे-बावनकर यांच्या मार्गदर्शनात आकर्षक अशी बांबूची वास्तू  प्रशिक्षणार्थींनी निर्माण केली. या प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप नुकताच महाव्यवस्थापक (कार्ययोजना) सईद  नाझीमुद्दीन यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाला. याप्रसंगी क्षेत्रीय कार्मिक व्यवस्थापक आर. के. सिंगनोडल अधिकारी (पर्यावरण) प्रशांत ठाकेरस्टाफ अधिकारी (स्थापत्य) नितीन नाईक, कल्याण समिती सदस्य सैजूद्दीन शेखबांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी आकाश मल्लेलवारसहाय्यक पर्यवेक्षक किशोर गायकवाडप्रबंधन प्रशिक्षणार्थी अमल कृष्णनउप अभियंता सिमय्या यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व पाहुण्यांनी प्रशिक्षणार्थींना त्यांच्या पुढील भविष्य व कार्यासाठी सदिच्छा व्यक्त करून काळाची गरज असलेल्या पर्यावरण स्नेही  बांबू बांधकाम प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले. प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण सुद्धा   याप्रसंगी करण्यात आले. या प्रशिक्षणार्थींना बांबूटेक ग्रीन सर्विसेस या  बांबू बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेद्वारा नियुक्तीपत्र देण्यात आले असून लवकरच संस्थेच्या विविध बांबू बांधकाम प्रकल्पात त्यांना कार्य करण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत ठाकेर यांनी केले. संचालन अनिल दहागावकर यांनी तर आशिष गोलदार यांनी आभार प्रदर्शन केले.   कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी अभय रॉय, संध्या तोगर,  ध्रुवदास मंडरेमधुकर मूनप्रवीण कावेरी, नीलेश पाझारे, सुरज सोनारकरराहुल स्वामीरितेश बडवाईकगौरव तोगर, अभिनय जोंधळेभूषण नंदनवारजयंती गावरेप्रतीक्षा कांबळेमयंक मूनअक्षद कारूषश्रेयश धोटेकनिंकनाथ भडकेमंगला यादवपराग यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *