चंद्रपुर जिल्हा

प्रशासनाची दिशाभूल करणऱ्या कोरोना बाधित रुग्ण तथा संबधित कुटुबियावर नगर पालिका प्रशासनाने केला गुन्हा दाखल

गडचांदूर (ता . प्र )
गडचांदूर येथे अमरावती वरून दाखल झालेल्या कोरोन बाधित रुग्णाच्या बेजबाबदार पणाने शहरातील ११ नागरिकांना कोरोनाची लागण झाली सदर रुग्ण हा अमरावती वरून एका एका खाजगी वाहनाने गडचांदूर शहरात दाखल झाला. त्यानंतर तो कोरोना (covid -१९) ची तपासणी करिता ते कोविड केयर सेंटर ( सावित्रीबाई फुले महाविद्यालय गडचांदूर) येथे पोहचले व कोविड-१९ करिता आरटी–पीसीआर चाचणी करिता गेला. परंतुआरोग्य विभागाच्या कर्मच्याऱ्याना स्वताचा योग्य पत्ता व दूरध्वनी क्रमांक न देता तसेच तिथे न थांबता किवा आरोग्य विभागला किवा नगर परिषदेला कोणालाही न कळविता परस्पर नातेवाईकाकडे निघून गेला. सदर रुग्णाने रात्री दारूची जंगी पार्टी केली या पार्टीत सहभागी असलेले सर्वांची कोविड-१९ तपासणी करण्यात आली व सर्व नागरिकांचे सकारात्मक अहवाल आले. करिता गडचांदूर शहरा मध्ये नगर परिषदे द्वारा संस्थात्मक विलगीकरनाची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु सदर नागरिक कोविड केयर सेंटर मधून परस्पर निघून गेला व त्यामुळे संसर्गाची बाधा झाली. त्यामुळे सदर इसमावर व त्याच्या नातेवाईकावर माहिती लपविणे, स्थानिक प्रशासनाची दिशाभूल करणे या अंतर्गत साथ रोग प्रतीबांधक कायदा १८६७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ (५१ –B ) , भारतीय दंड सहित १८६० चे कलम १८८ , २६९ , २७१, २९० या अंतर्गत एकूण ३ व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पूर्वी औरंगाबाद ते नागपूर ते गडचांदूर आलेल्या कोरोना बाधित व्यक्ती च्या कुटुबियावर स्थानिक प्रशासनाची दिशाभूल करणे करिता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.