चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

प्रतीक्षा संपली, मुंबई-बल्लारशा-मुंबई रेल्वेची सुरुवात.

चंद्रपूर – पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या सतत प्रयत्नामुळे अखेर मुंबई-बल्लारशा-मुंबई (ट्रेन नं. ०११२७/०११२८) साप्ताहिक superfast tarin सुपरफास्ट ट्रेन ५ जुलै पासून सुरू झाली आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना थेट मुंबईला जाण्याकरीता मोठी सोय होणार आहे.

कोरोना काळापासून मुंबईला जाण्याकरीता थेट रेल्वे गाडी आजपर्यंत सुरू न झाल्याने जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील तसेच सामान्य रेल्वे प्रवाशांना नागपूर किंवा वर्धा येथे जात मुंबई करीता प्रवास करावा लागत होता. या नव्याने सुरू होत असलेल्या रेल्वेगाडीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील व अन्यत्र प्रवाशांना मोठी सोय झाली आहे. Weekly train आज ही रेल्वे चंद्रपूर स्थानकावर पोहचताच रेल्वे सुविधा संघर्ष समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी चालकांचे स्वागत केले, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या सततच्या पाठपुराव्याने चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना थेट मुंबई प्रवास करता येणार आहे.

सध्या ही गाडी मुंबई लोकमान्य टिळक रेल्वे स्थानकावरून सुटत आहे, लवकर ही रेल्वे CSMT येथून सुरू व्हावी यासाठी अहिर प्रयत्नरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.