चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मयूर चहारे यांना पुरस्कार प्रदान

आज महाराष्ट्र दिनाचा औचित्याने चंद्रपूर येथे जिल्हा युवा पुरस्कार सन 2019-20 महाराष्ट्र शासनाचा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने पुरस्कार मयुर विट्ठल चहारे यांना मा नामदार श्री सुधीर मुनगंटीवार मंत्री वने सांस्कृतिक कार्य व पालकमंत्री चंद्रपूर गोंदिया यांचा हस्ते  प्रधान करण्यात आला.    यावेळी आमदार मा सुधाकर जी अडबाले मा. जिल्हाधिकारी विनय गोडा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी उपास्थित होते. मयुर चहारे यांनी जिल्ह्यात समाज हितोपयोगि व युवा  क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या भावी वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.