

*गडचिरोली*: गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयात विलगीकरणात असलेल्या सीआरपीएफ बटालियन मधील ३, धानोरा येथील १ व सिरोंचा येथील १ असे ५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह मिळाले आहेत. सकाळी ५ व दुपारी ५ असे एकूण आज १० रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. यातील सीआरपीएफ मधील एका रुग्णाची नोंद जिल्ह्याबाहेर झाल्यामुळे आजच्या जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 9 राहील. तसेच जिल्ह्यात आज २ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना दवाखान्यातून घरी सोडण्यात आले. यामध्ये नागपूर येथे उपचारात असलेला गडचिरोली गोकुळनगर येथील रहिवासी व आरमोरी येथील एकजण कोरोनामुक्त झाला .
यामुळे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या ५५ झाली. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण ६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या १२० झाली आहे. गडचिरोलीत असलेल्या एकुण सर्व ६४ रुग्णांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरु आहेत. यामध्ये ९ जिल्ह्याबाहेरील आहेत.



