गडचिरोली

गडचिरोलीत नवीन 81 कोरोना बाधित तर 63 कोरोनामुक्त*

गडचिरोली(जिमाका), दि.14* : जिल्हयात आज 81 नवीन कोरोना बाधित आढळून आले तसेएकुण सक्रिय बाधितांमधील आज 63 जणांनीकोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यातील एकुण सक्रिय कोरोना बाधितांचा आकडा 995 झाला.आत्तापर्यंतची एकुण कोरोना बाधित संख्या 4236 वर पोहचली आहे. यापैकी 3209जणांनी कोरोनावर मातही केली आहे. एकुण आत्तापर्यंत जिल्हयात 32 मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार जिल्हयात सद्या रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.75 टक्के आहे. सक्रिय रूग्णांची टक्केवारी 23.48 असून मृत्यूदर 0.76 टक्के आहे.आज नवीन 81 बाधितांमध्ये गडचिरोली 21, अहेरी 6, आरमोरी 19, भामरागड 3, चामोर्शी 9, धानोरा 7, एटापल्ली 5, कोरची 1, कुरखेडा 6, मुलचेरा 0, सिरोंचा 0 व वडसा येथील 4 जणांचा समावेश आहे. तसेच आजच्या 63 कोरोनामुक्त रूग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 34, अहेरी 1, आरमोरी 0, भामरागड 0, चामोर्शी 5, धानोरा 0, एटापल्ली 5, मुलचेरा 0, सिरोंचा 0, कोरची 13, कुरखेडा 0 व वडसा येथील 5 जणांचा समावेश आहे. नवीन बाधितांमध्ये गडचिरोलीतील बाधितांमध्ये कोटगल, आनंदनगर, गूरवाडा, कताली चक, बोदली, आयटीआय चौक, रेव्हून्यू कॉलनी, गणेश नगर, गोकूळनगर, कन्नमवार वार्ड, वनश्री कॉलनी, रामनगर व शहरातील इतर या ठिकाणी एक-एक रूग्ण मिळाला आहे. नवेगाव, बाम्हणी या ठिकाणी दोन दोन रूग्ण मिळाले आहेत. अहेरी येथे सीआरपीएफ 2 व प्राणहिता कॅम्प, इतर तालुक्यातील व नरसियापल्ली येथील एक-एक रूग्ण मिळाला आहे. एटापल्ली येथील 2 पोलीस व 3 सीआरपीएफ कोरोना बाधित आढळले आहेत. चामोर्शी मधील जयरामपूर, अडपल्ली व भेंडाळा येथे प्रत्येकी 1 बाधित मिळाला, आष्टी तसेच चामोर्शीत 3-3 बाधित मिळाले. भामरागड मधील 3 स्थानिक आहेत. कोरचीमधील 1 जण साल्हे गावचा आहे. धानोरा मधील पोलीस सटेशन पेंढरी, येरकड, हेटी व शहरातील प्रत्येकी 1-1 जणाचा समावेश आहे. तर लेखा येथील 3 जण बाधित आढळून आले आहेत. आरमोरी मधील शहरातील 14 बाधितांसह थानेगाव 1, कोसाबी 1, विठ्ठल मंदिराजवळ 1 व म.गांधी चौकात 1 जण कोरोना बाधित आढळून आला आहे. कुरखेडा मधील 4 स्थानिक तर 1 पोलीस स्टेशनमधील कोरोना बाधित मिळाला आहे. वडसा येथील कन्नमवार वार्ड, मधूबन कॉलनी, गांधी वार्ड व बगीचा चौक चोप प्रत्येकी एक एक बाधित आढळून आले आहेत.

Reply, Reply all or Forward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *