गडचिरोली(प्रती):गडचिरोली शहरात पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरुन नक्षल्यांनी एका युवकाची गोळ्या घालून हत्या केली. ही घटना काल(दि.11)रात्री एटापल्ली तालुक्यातील गट्टा(जांभिया)पोलिस मदत केंद्रांतर्गत किदरीटोला गावाजवळ घडली.रवी जुरु पुंगाटी असे मृत युवकाचे नाव असून, तो गुंडाजूर येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री 11 वाजताच्या सुमारास सशत्र नक्षली रवी पुंगाटीच्या घरी गेले. त्यांनी रवीला गावाबाहेर नेऊन गोळ्या घालून त्याची हत्या केली. नक्षल्यांनी त्याच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही टाकली असून, त्यात रवी पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
Related Articles
गडचिरोली जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 28
गडचिरोली जिल्ह्यात भुसावळ येथून आलेल्या 2 (दोन) जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून आता गडचिरोली जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 28 (अठ्ठावीस) झाली आहे. नव्याने आढळलेले रुग्ण धानोरा तालुक्यातील आहेत असे आरोग्य विभागाने कळविले आहे.
गडचिरोली जिल्हयात आज 4 नवीन कोरोना बाधित
* तर आज 4 जण कोरोनामुक्त *गडचिरोली,(जिमाका)दि.06*: आज जिल्हयात 4 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 4 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9387 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9233 वर पोहचली. तसेच सद्या 49 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची […]
आज जिल्हयात नवीन 24 कोरोना बाधित तर 18 कोरोनामुक्त*
*गडचिरोली* : जिल्हयात आज नव्याने 24 जण कोरोना बाधित आढळून आले. तसेच 18 जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. यामूळे जिल्हयातील सक्रिय कोरोनाबाधितांची आकडेवारी 171 झाली. तर आत्तापर्यंत 629 जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. जिल्हयातील एकुण बाधितांची संख्या 801 झाली. आज नव्याने 24 बाधित मिळाले त्यामध्ये गडचिरोली 3, भामरागड 1, सिरोंचा 2, अहेरी 7, चामोर्शी […]


