चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

धोका वाढला, इरई धरणाचे दरवाजे उघडले…

चंद्रपूर – आठवडा भर विश्रांती घेतल्यावर चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आधीच पुराने नागरिक सावरले नसताना पुन्हा नदी काठावरील गाव व नागरिकांना तडाखा बसण्याची शक्यता आहे.

इरई धरण 91 टक्के भरल्याने काही प्रमाणात पुन्हा दरवाजे उघडत पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय औष्णिक विद्युत केंद्राने घेतला आहे.

सध्या धरणातील पाण्याची पातळी अबाधित ठेवण्यासाठी 5 दरवाजे उघडणार असून त्यामध्ये एकूण 179.635 cum/sec पाण्याचा विसर्ग होणार आहे.  अर्ध्या तासांनी पुन्हा 0.50 mt ने धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार आहे, दर अर्ध्या तासाने 0.25 mt ने दरवाजे उघडण्यात येणार आहे. त्यानंतर 1 तासांनी पुन्हा धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात येणार आहे. नदी काठी राहणाऱ्या गाव व नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *