
गडचांदूर :- दोन मोटारसायकल आपापसात धडकल्याने एका 34 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहे.सदर घटना 10 मे रोजी दुपारी अंदाजे 4 च्या सुमारास गडचांदूर,कोरपना मार्गावरील माथाफाटा येथे घडली असून मृत व्यक्ती हा वणी तालुक्यातील कळमना येथील रहिवासी व जखमी तरूण हातलोनी येथील असल्याचे कळते. घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना कोरपना ग्रामीण रुग्णालय येथे पाठवले.मात्र या दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठवण्यात आले आहे.सदर घटनेचा तपास कोरपना पोलीस करीत आहे




