

वरोरा येथे आमदार चषक २०२३ चे दिमाखदार आयोजन
चंद्रपूर : वरोरा दिनांक 13 फेब्रुवारी खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या सौजन्याने व जय हिंद मंडळ वरोरा यांच्या द्वारा आयोजित अखिल भारतीय खुल्या कबड्डी सामन्याचे विजेतेपद जबलपूर येथील स्टार अकॅडमीने पटकावले .वरोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर दहा ते बारा मार्च दरम्यान अखिल भारतीय खुल्या कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते .12 मार्चला आयोजित बक्षीस वितरण समारंभात खा बाळू धानोरकर ,आमदार प्रतिभा धानोरकर, वरोरा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलास टिपले, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉक्टर सागर वझे, काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर ,भद्रावती चे तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र चिकटे आदींच्या उपस्थितीत विजेत्या संघांना बक्षीस देण्यात आली.
याप्रसंगी आयोजित सत्कार समारंभामध्ये समारंभात भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर ,माजी उपाध्यक्ष नगरपरिषद वरोरा अनिल झोटिंग ,माजी सभापती रवींद्र धोपटे, सुनंदा जीवतोडे, संजीवनी भोयर, गजानन मेश्राम यांचे सह वरोरा भद्रावती नगरपालिका क्षेत्रातील आजी माजी नगरसेवक, पंचायत समितीचे सदस्य आणि काँग्रेस कमिटीच्या विविध पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या तीन दिवसीय अखिल भारतीय कबड्डी सामन्याचे विजेतेपद रुपये एक लाख 51 हजार एक आणि चषक स्टार अकॅडमी जबलपूर ने पटकाविले, तर द्वितीय स्थानावर रोहतक श्रीराम संघ ,हरियाणा यांनी विजय मिळवित रोख पुरस्कार रुपये एक लाख एक हजार एक आणि चषक पटकाविला. तृतीय पुरस्कार 51 हजार एक रुपये एस. के. अकॅडमी ,हरियाणा यांना मिळाला तर चतुर्थ पुरस्कार रुपये पंचवीस हजार एक महाराष्ट्र सिटी पोलीस , मुंबई यांनी मिळविला.
या सामन्यांमध्ये चार पेक्षा जास्त खेळाडूंना बाद करणाऱ्या येथील जबलपूर संघातील गौड आणि हरियाणा संघातील सावंत यांचा रुपये दहा हजार रोख देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास टिपले आणि डॉ प्रशांत खुळे यांनी केले. यशस्वी आयोजनाकरिता जय हिंद मंडळाचे सचिव कासिफ खान, प्रवीण काकडे, उपाध्यक्ष बाबा आगलावे, त्रिशूल घाटे, राजू डोंगरे, गणेश गहूकर यांनी पुढाकार घेतला.


