
चंद्रपूर :- वरोरा येथून चोरी गेलेल्या दुचाकी तपासात स्थानिक गुन्हे शाखेने अट्टल गुन्हेगाराला अटक केली असून वरोरा व बल्लारपूर येथून चोरलेले दोन दुचाकी वाहन Crime असा एकूण साठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वरोरा पोलीस स्टेशन warora police station हद्दीत घरासमोर उभी असलेली दुचाकी होंडा ड्रीम नियो चोरी झाल्याची तक्रार दिनांक 6 ऑगस्ट रोजी वरोरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला असता, गोपनीय माहिती च्या आधारे रेकॉर्ड वरील आरोपी राजू दीपक वानखेडे वय 42 वर्ष, रा. गोपालपुरी, बालाजी वार्ड, चंद्रपूर याला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता वरोरा व Ballarpur police station बल्लारपूर येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली त्याचेकडून होंडा ड्रीम नियो MH 34 AW 6442 व बल्लारपूरातील होंडा एच एफ डीलक्स MH 37 S 7882 अश्या दोन मोटारसायकलसह एकूण 60,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. Bike thief arrested with two bikes; Action by local crime branch सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, अपर पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांचे नेतृत्वात सपोनी जितेन्द्र बोबडे, पोहवा नितिन साळवे, पोहवा प्रकाश बलकी, पोहवा. सुभाष गोहोकार यांनी केली.



