
गेल्या पंधरवाड्यात आयुध निर्माण चांदाच्या सेक्टर 4 मधील वसाहतीत दोन चिमुकलीवर हमला करणारा बिबट अखेर पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाल्याची घटना 9 ऑक्टोंबर रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. दि.10 ऑक्टोबरला सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बिबट्यास भद्रावती वनपरिक्षेत्रातील रोपवाटिकेत ठेवण्यात आले आहे.
चंद्रपूर येथील विभागीय वन अधिकारी खाडे,सहाय्यक उपवनसंरक्षक निकिता चौरे व वन परिक्षेत्र अधिकारी हरिदास शेंडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक विकास शिंदे,बीट वनरक्षक धनराज गेडाम तथा वन कर्मचारी, सार्ड वन्यजीव संस्थेचे श्रीपाद भाकरे,अमोल कूचेकर,अनुप येरने,प्रणय पतरंगे,आशिष चायकाटे, इम्रान पठाण,शैलेश पारेकर आदींच्या सहकार्याने सदर बिबट्यास जेरबंद करून वनविभागाच्या रोपवाटिकेत ठेवण्यात आले आहे.वरिष्ठांच्या आदेशानुसार त्यास कोणत्या जंगलस्थळी सोडायचा निर्णय घेण्यात येणार आहे.




