चंद्रपुर

दुचाकी वाहनाकरिता नवीन मालिका सुरु

चंद्रपूर दि. २७, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर येथे दुचाकी वाहनाकरिता एम.एच. ३४ बी.व्ही.-०००१ ते एम.एच. ३४ बी.व्ही.-९९९९ ही मालिका सुरु करण्यात आली असुन दुचाकी वाहनाचा आकर्षक क्रमांक व पसंती क्रमांक शासनाने नेमुन दिलेली विहित फी भरुन प्राप्त करून घेता येईल.आकर्षक क्रमांकाविषयी आवश्यक ती माहिती परिवहन विभागाची वेबसाईट https://parivahan.gov.in/fancy या पोर्टल वर असून यावर पसंतीचा क्रमांक ऑनलाईन पध्दतीने आरक्षित करता येईल. तसेच सदर क्रमांकाकरिता ऑनलाईन रक्कम अदा करता येईल असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.