चंद्रपूर (का.प्र ):दिव्यांग असलेल्या वडिलाना व आईला मारहाण करून मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रपुरातील इंदिरा नगर परिसरात आरोपी व घराशेजारी राहणाऱ्या परिवारासोबत भांडण झाले. त्यांनतर आरोपींनी पीडितांच्या घरी जाऊन आंधळे असलेल्या मुलीच्या वडिलांना तसेच आईला बेदम मारहाण केली. त्यानंतर घरात शिरून मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर पिडीतांनी थेट रामनगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पॉलिकांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक हाके यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे.
Related Articles
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये म.जोतिराव फुले यांची जयंती साजरी
चंद्रपूर (का.प्र.)जिल्हाधिकारी कार्यालय येथे ११ एप्रिलला महात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगांवकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले उपस्थित होते.
गत 24 तासात सहा कोरोनामुक्त 14 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू
आतापर्यंत 22,849 जणांची कोरोनावर मात ॲक्टीव पॉझिटिव्ह 136 चंद्रपूर, दि. 22 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 14 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 382 वर पोहोचली आहे. तसेच […]
जिवती, कोरपना व गोंडपिपरी नगरपंचायत आरक्षण सोडत 27 नोव्हेंबरला
चंद्रपूर दि.25 नोव्हेंबर : जिवती, कोरपना व गोंडपिपरी येथील नगरपंचायतीचे आरक्षण सोडत दि. 27 नोव्हेंबर 2020 रोजी निश्चित करण्यात येणार आहे. यासंबंधाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता दिली असून प्रभागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करावयाचे […]


