चंद्रपुर

डॉ.आंबेडकरांची जयंती मेश्राम कुटुंबाने केली घरुनच साजरी

चंद्रपूर (का.प्र.)कोरोनाच्या संकटामुळे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यंदा घरूनच साजरी करुन ‘घरीच रहा, सुरक्षीत राहा‘ या घोषणेला प्रतिसाद देत मेश्राम कुटूंबियांनी साजरी केली. याप्रसंगी महामानवाच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातुन डॉ.आंबेडकर यांनी राष्ट्र उभारणीत दिलेले योगदान अजरामर राहील. समाजातील दुर्बल, वंचीत, उपेक्षीत घटकांना आत्मसन्मान मिळवुन देत ताठ मानेने जगण्याची ताकद त्यांनी दिली. डॉ.बाबासाहेबांच्या मानवतावादी विचारांचे व शिकवणीचे पालन करुन देशहीतासाठी कायद्याचे पालन करत मेश्राम कुटुंबाने घरीच जयंती साजरी करुन कोरोना विरुद्धच्या युद्धात आपण सहभागी असल्याचे उत्तम उदाहरण समाजासमोर दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *