
चंद्रपूर शहरातील वर्दळीच्या ठिकाणी आज 13 जून रोजी दुपारी दस्तगिर दरगाह च्या बाजूला अचानकपणे पोलीस व्हॅन नालीत फसल्याने काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली.
चंद्रपूर शहरातील पोलीस व्हॅन क्रमांक MH348482 हे वाहन गिरनार चौकातून गांधी चौक येथे जात असताना मागून एम्बुलन्स वाहन सायरन देत रुग्णालयात जात होती. त्याचवेळी एम्बुलन्स ला साईड देत असताना पोलीस व्हॅन नालीत फसली.
मात्र पोलीस व्हॅन वाहन चालकाच्या सतर्कतेने अनुचित प्रकार टळला. यादरम्यान गांधी चौक कडे जाणारी वाहतूक काही काळासाठी विस्कळित झाली होती. सायंकाळपर्यंत हे वाहन बाहेर काढण्यात आले नव्हते.



