चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

चंद्रपुर जिल्हा शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन चे जिल्हा अधिवेधन थाटात संपन्न.

मानधन वाढीसाठी 18 जुलै रोजी जिल्हा परिषद कार्यालय वर विशाल मोर्चा काढण्याचा आयटक चा निर्णय.

चंद्रपुर : गेल्या 15 ते 20 वर्षांपासून राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजने अंतर्गत अगदी 1500रु. तुटपुंज्या मानधनात जिल्हा परिषद व प्रायव्हेट शाळेत दुपारचे भोजन बनविणाऱ्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे जिल्हा अधिवेशन मोठया थाटात स्थानिक नागाचारी महाराज सभागृहात संपन्न झाले .
अधिवेशना चे उदघाटन स्त्री शिक्षणाची जनक सवित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी उदघाटक म्हणून संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉ दिवाकर नागपुरे यवतमाळ ,सह उदघाटक कॉ दिलीप बर्गी अध्यक्ष आयटक,कार्यक्रमा चे अधक्ष स्थानी कॉ वनिता कुंटवार,प्रमुख मार्गदर्शक कॉ विनोद झोडगे राज्य महासचिव,भाकप चे जिल्हा सचिव प्रा कॉ नामदेव कंनाके ,कॉ प्रदीप चिताडे,सविता गटलेवार ,कॉ राजू गईनवार यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिवेशनात कर्मचाऱ्यांन च्या विविध मागण्या विषही चर्चा करण्यात आली ज्या मध्ये कर्मचाऱ्यांना किमान 24 हजार वेतन देण्यात यावे,चपराशी कम कुक या पदावर नियुक्ती देण्यात यावी, सामाजिक सुरक्षा लागू करण्यात यावी,कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने कामावरून कमी करू नये,त्यांच्या कामाशिवाय अतिरिक्त कामे सांगू नये ,सेंट्रल किचन रद्द करण्यात यावी,सर्व शाळेत ग्यास सिलेंडर ,धान्यादि माल व खाद्य तेल उपलब्ध करून देण्यात यावे,दरवर्षी करार नामा करण्याची पद्धत बंद करून त्याऐवजी कामावर लागल्या पासून नियुक्ती पत्र देण्यात यावे तसेच शापोआ कर्मचाऱ्यांना ओळख पत्र व वर्षातून दोन गणवेश देण्यात यावे.12 महिन्याचे मानधन देण्यात यावे किमान वेतन मिळेपर्यंत दहा हजार रुपये मानधन वाढ लागू करण्यात यावी आदी मागण्या विषही चर्चा करून 2022 हे वर्ष शापोआ कर्मचाऱ्यांनच्या मानधन वाढीचे असले पाहिजे असा निर्णय घेऊन येत्या 18 जुलै 2022 रोजी जिल्हा परिषद वर आझाद बगीचा येथून सकाळी 12 वाजता विशाल मोर्चा काढण्यात येणार असल्याचा ईशारा कॉ विनोद झोडगे यांनी दिला आहे.
पुढील 3 वर्षा साठी 21 लोकांची नवीन कार्यकारणी गठीत करून अधक्ष म्हणून कॉ विनोद झोडगे तर सचिव पदी कॉ वनिता कुंटवार यांची नियुक्ती करण्यात आली. अधिवेशनाचे प्रास्ताविक कॉ श्रीधर वाढई संचालन कॉ रवींद्र उमाटे आभार कॉ मनोज करकाडे नि मानले यावेळी जिल्ह्यातील हजारो शालेय पोषण आहार कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *