गोपानी आयर्न अॅन्ड पावर कंपनीच्या विरोधात 28 रोेजी मोर्चा
गोपानी आयर्न अॅन्ड पॉवर (इं) प्रा.लि. ताडाळी या कंपनीने पूर्व सूचना न देता 500 कामगारांना कामावरुन बंद केल्याबाबत मंगळवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी ताडाळी एमआयडीसी स्पंज आयर्न कामगार संघटना चे अध्यक्ष दिनेश चोखारे व महासचिव रमेश बूचे यांच्या नेतृत्वात गांधी चौक चंद्रपूरातून जिलाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत सांगितले की, गोपानी आयर्न कंपनीने कामगारांना पूर्व सूचना न देता जुलै 2021 या महिन्याचा अर्धा पगार कापण्यात आला. त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी 120 कामगारांना कामावरुन कमी करण्यात आले.



