
राजुरा : राजुरा तालुक्यातील चिंचोली खुर्द येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालय कला, वाणिज्य व विज्ञान चिंचोली खुर्द ता. राजुरा, जिल्हा, चंद्रपूर येथे छगुणा झाडे व अंजली मेश्राम या महाविद्यालयात बी. ए प्रथम वर्षात शिक्षण घेत होते. छत्रपती शिवाजी महाविद्यालय कला, वाणिज्य व विज्ञान चिंचोली खुर्द ता. राजुरा, जिल्हा, चंद्रपूर या महाविद्यालयाला परीक्षाकेंद्र नसल्याने 20 की. मी अंतरावर उन्हाळी 2022 परीक्षा देण्याकरिता परीक्षाकेंद्रा वर जात असतांना राजुरा – गडचांदूर मार्गावर खामोना गावाजवळचा अपघातात दोन्ही विध्यार्थिनी चा मृत्यू झाला होता..
महाविद्यालयाचा प्रयत्नाने गोंडवाना विद्यापिठाचा विद्यार्थी अपघात योजने अंतर्गत पंचविस हजार रक्कमेचे दोन्ही मुलींचा पालकांना चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा हस्ते चेक देण्यात आले..




