गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यात आज नवीन 70 कोरोना बाधित

आज नवीन 70 कोरोना बाधित*
131 कोरोनमुक्त                                                                                              जिल्ह्यात नवीन 2 कोरोना बाधितांच्या मृत्यू सह आज 70 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच 131 जणांनी कोरोनावर मात केली.
आज 2 मृत्यूची नोंद झालेल्या कोरोनाबाधितांमध्ये आरमोरी येथील 42 वर्षीय अंगणवाडी सेविका मधुमेहग्रस्त होती. तसेच 68 वर्षीय भेंडाळा चामोर्शी मधील मधुमेहग्रस्त व हायपरटेन्शन ग्रस्त शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
*आज नवीन 70 बाधितांमध्ये* गडचिरोली 14, अहेरी 0, आरमोरी 6, भामरागड 6, चामोर्शी 6, धानोरा 12, एटापल्ली 9, कोरची 3, कुरखेडा 3, मुलचेरा 5, सिरोंचा 3 व वडसा येथील 3 जणांचा समावेश आहे. तसेच आजच्या 131 कोरोनामुक्त रूग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 47, अहेरी 25, आरमोरी 4, भामरागड 5, चामोर्शी 12 धानोरा 8, एटापल्ली 0, मुलचेरा 5, सिरोंचा 3, कोरची 2, कुरखेडा 3 व वडसा येथील 17 जणांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.