गडचिरोली

गडचिरोली जिल्हयात आज 7 नवीन कोरोना बाधित

* तर आज  2 कोरोनामुक्त
*गडचिरोली,(जिमाका)दि.21*: आज जिल्हयात 7 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 2 जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9459 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9290 वर पोहचली. तसेच सद्या 64 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 105 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.21 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.68 टक्के तर मृत्यू दर 1.11 टक्के झाला.नवीन 7 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 6 जणाचा समावेश आहे. तर धानोरा 01 जणाचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या 2 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 2 जणाचा समावेश आहे.नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील रेवेन्यु कॉलनी वार्ड क्र.15 महिला विद्यालय जवळ 01, चामोर्शी रोड 02, सीआरपीएफ 01, कॉम्प एरिया 01, सोनापूर कॉम्पलेक्स 01 , धानोरा तालुक्यातील बाधितांमध्ये रामनगर येथील 01 बाधिताचा समावेश आहे.
**

Leave a Reply

Your email address will not be published.