गडचिरोली

गडचिरोली जिल्हयात आज 45 नवीन कोरोना बाधित

*जिल्ह्यात 1 लक्ष कोरोना चाचण्या पुर्ण, पैकी 8.9 टक्के आढळून आले बाधित

*तर आज 10 जण कोरोनामुक्त*

*गडचिरोली,(जिमाका)दि.30*: मे महिन्यात कोरोना बाधित रुग्ण गडचिरोली जिल्हयात आढळून आल्यानंतर आतापर्यंत एक लक्ष संभावित व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी आत्तापर्यंत 8.99 टक्के म्हणजेच 9001 लोकांचे कोरोना अहवाल सकारात्मक आढळले आहेत. तर आज जिल्हयात 45 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 10 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9001 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8714 वर पोहचली. तसेच सद्या 186 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 101 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.81 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.07 टक्के तर मृत्यू दर 1.12 टक्के झाला.नवीन 45 बाधितांमध्ये गडचिरोली 7, अहेरी 27, आरमोरी 2, भामरागड 0, चामोर्शी 5, धानोरा 2, एटापल्ली 0, कोरची 0, कुरखेडा 0, मुलचेरा 0, सिरोंचा 2, व वडसा येथील 0, जणांचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या 10 रूग्णांमध्ये गडचिरोली 9, अहेरी 0, आरमोरी 0, भामरागड 0, चामोर्शी 1, धानोरा 0, एटापल्ली 0, मुलचेरा 0, सिरोंचा 0, कोरची 0, कुरखेडा 0, व वडसा मधील 0,जणाचा समावेश आहे.नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील रामनगर 1, आरमोरी रोड 1, वनश्री कॉलनी 1, बैरंग 1, मारोडा 1, कलेक्टर कॉलनी 1, गोकूलनगर 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ 9, 37 बीएन सीआरपीएफ 2, एसआरपीएफ 8, स्थानिक 1, रेपनपल्ली 3, आलापल्ली 3, बोरी 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये वडेगांव 1, स्थानिक 1,भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 0,, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये रामपूर 1, लखमपूर बोरी 1, स्थानिक 2, आष्टी 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ 2, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये 0,, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0,, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 0, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 0, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 0 जणाचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.