गत 24 तासात 1044 कोरोनामुक्त, 1458 पॉझिटिव्ह तर 25 मृत्यू
आतापर्यंत 45,132 जणांची कोरोनावर मात
ॲक्टीव पॉझिटिव्ह 16,809
चंद्रपूर, दि. 2 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1044 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1458 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 25 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 62 हजार 895 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 45 हजार 132 झाली आहे. सध्या 16 हजार 809 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 84 हजार 693 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 16 हजार 906 नमुने निगेटीव्ह आले आहेत.



