
कृषी महोत्सवात ओबीसी सेवा संघांचा स्टॉलने वेधले लक्ष
चंद्रपूर येथे दिनांक 10 फेब्रुवारी पासून कृषी महोत्सवाचे आयोजन चांदा क्लब ग्राउंड,चंद्रपूर येथे करण्यात आलेले आहे .यात विविध स्टॉल लावण्यात आलेले आहेत. ओबीसी सेवा संघातर्फे मुख्यमंत्र्यांना ओबीसी जनगणनेसाठी शपथ पत्र पाठविणारा स्टॉल ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.अनिल डहाके, महासचिव विलास माथनकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे.ओबीसी सेवा संघाच्या स्टॉलचे उद्दघाटन संदीप गिऱ्हे,जिल्हाप्रमुख,शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)यांच्या हस्ते झाले. यावेळी विनय धोबे,पवन राजूरकर, अनिकेत दुर्गे,खुशाल काळे,सुरज दहेगांवकर, मयूर सोनपितरे, गौरव झाडे, राजेश आंबेकर, हनुमान बेरड,युवराज बांबोडे,प्रशिक नागदेवते,हर्षल कारमेंगे,सूरज गेडाम,विपुल देऊळकर उपस्थित होते.
बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सुद्धा ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी या आशयाचे 5 हजार शपथपत्र पाठविण्याचा मानस आहे. ओबीसी जनगणनेसाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी यासाठी हा प्रयत्न करण्यात येत आहे.पत्राचा नमुन्यात जय महाराष्ट्र, जय ओबीसी
मी शपथ घेतो की, बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्रात ओबीसींची स्वतंत्र जातनिहाय जनगणना झाली नाही तर मी व माझा परिवार आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार नाही.अशा प्रकारचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे.सोबतच सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे.या स्टॉलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.मोठ्या प्रमाणात याला प्रतिसाद मिळत आहे.समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.या पत्राची दखल घेऊन ओबीसींची जनगणना केली नाही तर येत्या काळात गावागावात जाऊन ओबीसींची जनगणना नाही, तर आपल्या पक्ष्याला मतदान करणार नाही अशी सार्वजनिक शपथ घेणार आहे.असे प्रतिपादन ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. अनिल डहाके यांनी केले आहे.




