*आयुष मंत्रालयाच्या “त्या” अध्यादेशाचा चंद्रपुरातही निषेध*
*आय एम ए चा देशव्यापी बंद १००% यशस्वी*
*मिक्सओपॅथीच्या समित्या रद्द करण्याची मागणी*
केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाने पोस्ट ग्रॅज्युएट आयुर्वेदिक व्यवसायिकांना ५८ विविध शस्त्रक्रिया करण्याची परवानगी एका अध्यादेशाद्वारे प्रदान केली.या विषयाचा संपूर्ण देशात विरोध होत असून इंडियन मेडिकल असोसिएशनने देशव्यापी बंद पुकारला. या बंदमध्ये हे चंद्रपूरातील किमान साडेचारशे डॉक्टर्सनी सहभाग नोंदवून केंद्र शासनाच्या या धोरणाचा शुक्रवार(११ डिसेंम्बर)ला निषेध केला. चंद्रपुरातील दवाखाने सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आल्याने हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे चंद्रपुरातील बंद आय एम ए चे अध्यक्ष डॉक्टर अनिल माडूरवार, इलेक्ट प्रेसिडेंट(आय एम ए) डॉक्टर मंगेश गुलवाडे, सचिव सुरभी मेहरा, कोषाध्यक्ष डॉक्टर अजय दुधलवार यांच्या नेतृत्वात चंद्रपुर बंद पाळण्यात आला. यामध्ये विशेषत्वाने चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या पाचशे विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदविला.
कोविडच्या संकटात आय एम ए च्या राज्यभरातील ४५०००डॉक्टरांनी सेवा दिली. पण आयुष् मंत्रालयाने वैद्यांना सक्षम करण्यासाठी या नवीन अध्यादेशाच्या माध्यमातून ५८ शस्त्रक्रिया करण्याचे पाठबळ दिले आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रात भारतीय डॉक्टर जगभरात आघाडीवर आहेत भारतीय डॉक्टर जागतिक आरोग्य यंत्रणेच्या विकासाला हातभार लावत असताना केंद्र शासनाने असा निर्णय घेणे कल्पनेच्या पलीकडे आहे. शासनाने हा निर्णय त्वरित रद्द करावा अशी मागणी या बंद दरम्यान आय एम ए चे अध्यक्ष डॉक्टर अनिल माडुरवार यांनी केली.
केंद्र शासनाने नॅशनल मेडिकल कमिशन गठीत करून ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक आणि युनानी या सर्व पॅथिनां एकत्र करून अभ्यासक्रम बनविण्यासाठी चार समित्या तयार केल्या. केंद्र शासनाचे हे पाऊल देखील डॉक्टर्ससाठी धोकादायक आहे. त्यामुळे केंद्र शासनाने या समित्या देखील रद्द कराव्या मिक्सपॅथीचे धोरण अंमलात आणू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. बंद दरम्यान चंद्रपुरातील डॉक्टर्स मंडळींनी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवून नियोजित शस्त्रक्रिया केल्या, त्यामुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळाला.



