*जिल्हाधिकारी यांना दुरध्वनीवरुन व्यवस्था सुधारण्याच्या केल्या सुचना
*रुग्णांच्या नातलगांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने केली जाणार भोजन व्यवस्था
चंद्रपूर (ता.प्र): चंद्रपूर येथील कोविड सेंटर बाबतच्या अनेक तक्रारी येत आहे. दरम्याण आज आमदार किशोर जोरगेवार यांनी कोणतीही पुर्व सुचना न देता कोविड सेंटरला आकस्मिक भेट देत तेथील वस्तूस्थिची पाहणी केली. यावेळी त्यांनी लगेच जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत येथील व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या सुचना केल्यात. तसेच उपचार घेत असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांच्या नातलगांची गैरसोय लक्षात घेता त्यांच्या भोजनाची व्यवस्था यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्याचे आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेत. त्यानूसार आता उद्यापासून येथील रुग्णांच्या नातलगांच्या भोजनाची व्यवस्था यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने केली जाणार आहे.चंद्रपूरात कोरोना बाधीतांच्या संख्येने दिवसाला वाढ होत आहे. त्यामूळे आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सहाजीकच याचा परिणाम येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांवर होत आहे. असे असले तरी येथील रुग्णांची योग्य ती काळजी घेतल्या केली पाहिजे असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले होते. मात्र या कोविड सेंटर बाबतच्या तक्रारी कमी होत नसल्याने आज शनिवारी सकाळी ८ वाजता आमदार किशोर जोरगेवार यांनी येथील कोविड सेंटरला आकस्मीक भेट दिली. कोणतीही पूर्व सुचना न देता अचानक कोविड सेंटरमध्ये आमदार आल्याने अधिका-यांची काही काळ चांगलीच तारांबर उडाली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी कोविड सेंटरची पाहणी करत उपाययोजनांची माहिती जाणून घेतली येथील काही त्रुट्या लक्षात येताच आमदार किशोर जोरगेवार यांनी तात्काळ जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत त्यांना येथील परिस्थितीशी अवगत केले. तसेच येथील व्यवस्था सूधारण्याच्या दिशेने आवश्यक सुचना केल्यात. येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांचे नातलगही रुग्णालयाबाहेर थांबले असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी रुग्णांच्या नातलगांची भेट घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या यात बाहेर गावून आलेल्या रुग्ण्यांच्या नातलगांची संख्या अधिक आहे. त्यामूळे येथे त्यांची चांगलीच गैरसोय होत आहे. हि बाब लक्षात येताच रुग्णांच्या नातलगांच्या भोजनाची व्यवस्था यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करा असे आदेश आमदार किशोर जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. आदेश मिळताच यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते कामाला लागले असून उद्यापासून येथे असलेल्या रुग्णांच्या नातलगांसाठी भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे.




