चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

अष्टभुजा वार्डात एका 22 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घुण हत्या

चंद्रपूर : शहरातील अष्टभुजा वार्डात एका 22 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घुण हत्या करण्यात आल्याची आज बुधवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. मंगळवारच्या  रात्री दहाच्या सुमारास त्याची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणने आहे. धरमवीर यादव उर्फ ​​डब्ल्यू असे मृतकाचे नाव असून तो अष्टभुजा वार्डातील रमाईनगरातील रहिवासी होता. पोलिस सुत्रानुसार, काल मंगळवारी (24 मे ) ला रात्री 10 वाजताच्या सुमारास काही तरुणांनी धरमवीर यादव यांना फोन करून बोलाविले होते. त्यानंतर मित्रांमध्ये भांडण होवून त्याच्यावर चाकूने हल्ला केला. जखमी अवस्थेत धरमवीर घटनास्थळावरून पळून गेला. मात्र रमाबाई नगरातील मंदिराजवळ त्यालागाठून मारेकऱ्यांनी त्याची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली. आज बुधवारी सकाळी सहा वाजता ही घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडून होता. सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकाचे मदतीने आरोपींचा शोध घेण्यात आला. परंतू शोध लागला नाही. रामनगर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनाला पाठविले आहे. सदर घटनेनंतर आरोपींचि शोध घेण्यात आला. यामध्ये काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी धरमवीर याचेवर दोन भावांच्या हत्येचाही आरोप होता, त्या हत्येच्या वेळी तो अल्पवयीन होता. याच प्रकरणाचा वचपा काढण्यासाठी त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.