
दोन आरोपिंना स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक
चंद्रपुर :- दिनांक 10/11/2022 रोजी रात्री पोलीस स्टेशन शेगांव हद्यीत चारगांव (बु.) वन विभाग चेक नाका जवळील झुडपात एका अनोळखी इसमाची अनोळखी आरोपींनी दगडाने ठेचुन निर्घुन खुन केल्याची घटना घडली. सदरची माहीती प्राप्त होताच घटनास्थळी पोस्टे शेगांव चे ठाणेदार मेश्राम, पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा श्री. आयुष नोपानी, मा. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी तात्काळ भेट दिली. पोलीसांना खुन झालेल्या इसमाची ओळख पटविण्यात यश आले. त्याचे नांव तुळशिराम महाकुलकर, वय अं. 60 वर्षे रा. भेंडाळा असे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मा. पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी यांनी सदर गुन्हयातील अनोळखी आरोपीतांचा शोध लावण्याचे आदेश दिले. त्यावरून पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि मंगेश भोयर व सपोनि जितेंद्र बोबडे यांचे नेतृत्वात दोन विशेष पथके तयार केली. सदरचे घटनास्थळ हे निर्जनस्थळ असुन मानवी वस्ती देखील लागलेली नव्हती. त्यामुळे पोलीसांना अनोळखी आरोपीतांचा छळा लावण्याचे आव्हाण निर्माण झाले होते. पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर व पथकातील अंमलदार यांनी तपासात आपले अनुभवाचे कौशल्य वापरून गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्याचे दृष्टीने तपास सुरू केला. सदर मयताचा खुन करण्यामागील उद्देश समजुन येत नव्हता. तरी देखील आपले तपासाचे कौशल्य पणाला लावुन सतत दोन दिवस त्याच परीसरात राहुन अहोरात्र मेहनत घेवुन गोपनिय माहीती काढुन दोन इसम नामे 01) सौरभ प्रकाश हिवरे, वय 22 वर्षे, रा. चारगांव (बु.) ता. वरोरा, जि. चंद्रपूर व 02) अतुल मधुकर मडकाम, वय 29 वर्षे रा. जाम ता. समुद्रपुर जि. वर्धा ह.मु. चारगांव (बु.) ता. वरोरा, जि. चंद्रपूर यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे गुन्हया संबंधाने कौशल्यपुर्वक उलट तपासणी केली ते निरूत्तरीत झाल्यानंतर त्यांच्यावर संशय बळावला त्यावरून त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता या दोघांनी मिळुन सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले त्यावरून पुढील तपास कामी पोलीस स्टेशन शेगांव यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास शेगांव पोलीस करीत आहेत. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांचे नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक मंगेश भोयर, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पो.हवा. धनराज करकाडे, संजय आतकूलवार, प्रकाश बल्की, नितीन साळवे, स्वामीदास चालेकर, ना.पो. कॉ. अजय बागेसर, चंदु नागरे, पो. कॉ. संदिप मुळे, प्रशांत नागोसे, गोपाल आतकुलवार, प्रांजल झिलपे, कुंदनसिंग बावरी, अमोल धंदरे, महीला अंमलदार निराशा तितरे, चालक पोहवा प्रमोद डंभारे, नापोकॉ दिनेश अराडे यांनी केली.




