
मुल: मुल तालुक्यातील बफरझोन क्षेत्रात असलेल्या फुलझरी येथील डोनी जंगलात गुऱ्हे चराईसाठी नेलेल्या गुऱ्हाख्याला वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना (११ सप्टे.२०२२ ला ) सकाळी ११.३० वाजता घडली. फुलझरी येथील रहिवासी असलेला किसन आबाजी वसाके (४९) असे जखमी गुऱ्हाख्याचे नाव आहे. सदर घटना डोनी बिट ३ कक्ष क्रमांक ३६० मध्ये घडली. नेहमीप्रमाणे जंगलात गुऱ्हे चराईसाठी नेले असता जंगलात दबा धरून असलेल्या वाघाने गुराख्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच लगेच वनरक्षक बोरकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने जखमी गुऱ्हाख्याला मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला गंभीर जखमी असल्याने पुढील उपचाराकरिता चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. वन विभागाकडून जखमी रुग्णाला तात्काळ १०,०००/- मदत देण्यात आली.



