चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

वाघाच्या हल्यात शेतकरी ठार दोन

ब्रह्मपुरी वरून ८ किलोमीटर अंतरावर ब्रह्मपुरी उत्तर वनपरिक्षेत्रामध्ये येणारे अड्याळ येथील शेत शिवारात मेंढा या गावचे रहिवासी विलास विठोबा रंधये यांची शेती ही अड्याळ या गावी असल्याने ते आपल्या शेतीमध्ये निंदा सुरू असताना ते निंदा बरोबर होत आहे की नाही या देखरेखीकरिता जंगलालगतच्या उंच बांधीवरून उभे होऊन देखरेख करत असताना वाघाने मागून झडप घेऊन त्यांना जागीच ठार केले . विलास विठोबा रंधये यांची वय 48 वर्षे . हि घटना बारा वाजताच्या सुमारास घडली आहे . वाघाने हल्ला केल्याची घटना आहे. या आधी दुधवाई येतील मूखरू राऊत यावर वाघाने हल्ला करून ठार केले होते तर पडमापुर येथील प्रभाकर मडावी यास जखमी केले होते सतत ही दुसऱ्या दिवशीही घटना घडली असून गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.