
चंद्रपूर: सहाय्यक डॉक्टराला झालेल्या मारहाणीच्या विरोधात निवासी डॉक्टरांनी शुक्रवारपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात संप पुकारला. जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातील आपात्कालीन सुरक्षा यंत्रणा बळकट करून अशा घटनांना पायबंद घालण्याची मागणी डॉक्टरांनी केली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एका रुग्णावर उपचार सुरू होते. या रुग्णाचे नातेवाईक धमकावून डॉक्टरांकडून रुग्णाचे उपचार करून घ्यायचे. या रुग्णाचा १७ जानेवारी
२०२३ रोजी त्यांच्याच घरी मृत्यू झाल्यानंतर १४ दिवसांनंतर १ फेब्रुवारीला रुग्णाच्या नातेवाईकांनी रात्री १२. ३० वाजता कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना मारहाण केली आणि निवासस्थानापर्यंत पाठलाग केल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी निवेदनातून केला. अशा आहेत मागण्या
वैद्यकीय महाविद्यालयाप्रमाणे चंद्रपूर येथेही सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी, आपत्कालीन विभागातील सायरन दुरुस्त करावी यासह अनेक मागण्या पुढे केल्या.



